20 प्रश्न - मी मद्यासक्त असू शकतो का?
- मद्यपानामुळे तुमचा कामाचा वेळ वाया जातो का?
- मद्यपानामुळे तुमचे कौंटुंबिक जीवन दुःखी होत आहे का?
- तुम्ही इतरांच्या सोबत असताना संकोच वाटत असल्याने मद्यपान करता का?
- तुमच्या मद्यपानामुळे तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होत आहे का?
- मद्यपान केल्यानंतर तुम्हाला कधी अपराधीपणाची किंवा पश्चात्तापाची भावना आली आहे का?
- मद्यपानामुळे तुम्हाला कधी आर्थिक अडचणी आल्या आहेत का?
- मद्यपान करताना तुम्ही खालच्या पातळीचे सोबती निवडता आणि गलिच्छ वातावरणाकडे वळता का?
- तुमच्या मद्यपानामुळे तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत निष्काळजीपण करता का?
- मद्यपान सुरु केल्यापासून तुमची महत्त्वाकांक्षा कमी झाली आहे का?
- तुम्हाला एका विशिष्ट वेळी मद्य प्यावेच लागते का?
- तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी मद्य प्यावेच लागते का?
- मद्यपान केल्याने तुम्हाला झोप येण्यास त्रास होतो का?
- मद्यपान केल्यापासून तुमची कार्यक्षमता कमी झाली आहे का?
- मद्यपान केल्याने तुमची नोकरी किंवा व्यवसाय धोक्यात येत आहे का?
- तुम्ही चिंता किंवा संकटापासून सुटका मिळवण्यासाठी पिता का?
- तुम्ही एकटेच मद्यपान करता का?
- मद्यपानामुळे तुमची कधी स्मृती पूर्णपणे गेली आहे का?
- तुमच्या डॉक्टरांनी कधी मद्यपान केल्याबद्दल तुमच्यावर उपचार केले आहेत का?
- तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मद्यपान करता का?
- मद्यपान केल्यामुळे तुम्ही कधी रुग्णालयात किंवा एखाद्या संस्थेत गेला आहात का?
🔵 जर तुम्ही कोणत्याही 1 प्रश्नाचे उत्तर हो दिले तर तुम्ही मद्यपी होण्याची शक्यता आहे.
🔵 जर तुम्ही कोणत्याही 2 प्रश्नांना हो असे उत्तर दिले तर तुम्ही मद्यपी असण्याची जास्त शक्यता आहे.
🔵 जर तुम्ही 3 किंवा त्याहून अधिक प्रश्नांची उत्तरे हो दिली तर तुम्ही निश्चितच मद्यपी आहात.
