अनामिकता हे आमचे मूळ तत्व आहे.

माझं नाव कुमार एक्स आणि मी एक कृतज्ञ मद्यमुक्त दारुडा आहे.

ज्याला दारूपासून दूर राहण्याची इच्छा आहे अशा
प्रत्येक मद्यपीडिताचे मी स्वागत करतो...
तसेच शांती, स्थिरता आणि आनंद हवे आहे अशा
मद्यपीडिताच्या कुटुंबातील सदस्यांचे मी स्वागत करतो.
आम्ही गव्हर्न्मेंट रजि. सामाजिक सेवा उपक्रम केंद्र आहोत.

एकट्याने शक्य नाही...
पण सोबत शक्य आहे.

मद्यपाश म्हणजे काय?

मद्यपाश हा जगातील तिसरा सर्वात वेगाने वाढणारा प्राणघातक आजार आहे.
डब्ल्यू एचओ आणि ए एम ए यांनी मद्यपाश हा आजार म्हणून घोषित केला आहे.
मद्यपाश ही एक शारीरिक अ‍ॅलर्जी आहे जी मानसिक आकर्षणाशी जोडलेली आहे.
मद्यपाश हा नकार, अस्वस्थता, मतभेदाचा आजार आहे.
मद्यपाश हा 200 हून अधिक शारीरिक आजारांचे कारण आहे आणि त्यापैकी 37 आजार दीर्घकालीन आहेत.
जगभर घडणाऱ्या सर्व गुन्ह्यांपैकी ३५% गुन्हेगारी कृत्यांमध्ये मद्यपाश आजार कारणीभूत असतो.

मद्यपाश हा आजार वैद्यकीयदृष्ट्या अद्याप बारा होऊ शकत नाही, परंतु त्यातून मुक्तता शक्य आहे.

मद्यपाशातून बरे होण्यासाठी मदत घेणे का आवश्यक आहे?

मद्यपाश हा नकाराचा आजार आहे.
मद्यपाशामुळे व्यक्तिमत्व विकार निर्माण होतो. मद्यपी व्यक्ती मानसिक पातळीवर होणारे हे बदल समजू शकत नाही.

मद्यपाश हा कौटुंबिक आजार आहे. कुटुंबातील एक किंवा अधिक मद्यपी नकळत कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये समान मानसिक स्थिती निर्माण करू शकतात. 

मद्यपाश हा भ्रमाचा आजार आहे. ही व्यक्ती वेडयासारखी का वागतेय?
या प्रश्नाने लोक नेहमीच गोंधळात पडलेले दिसतात.

कारण मद्यपाश हा सर्वात धोकादायक आजार आहे. का?
कारण, इतर सर्व आजारांची लक्षणे आधी दिसतात.
पण मद्यपाश या आजाराची लक्षणे आजार बळावल्यानंतर दिसू लागतात..

चांगली बातमी अशी आहे की... मदत उपलब्ध आहे.
तुम्हाला फक्त ती स्वतःच्या इच्छेने स्वीकारावी लागेल.

हे लक्षात घ्या

या गोष्टी विसरून जा

मद्यपाश हा पाप आहे
चूक
मद्यपाश हा शाप आहे
चूक
मद्यपाश हे पूर्वजन्म कर्म आहे
पूर्णपणे चूक
मद्यपाश भूतबाधेमुळे होतो.
पूर्ण अंधश्रद्धा

या गोष्टी करा

प्रामाणिकपणा ही गुरुकिल्ली आहे.
मोकळे मन हे प्रवेशद्वार आहे.
इच्छाशक्ती द्वार उघडते .

प्रामाणिक रहा. मोकळे मन ठेवा. मानाने तयार राहा. मग तुम्ही जिंकाल.

पंख उघडून भरारी घ्या

जबरदस्तीचे कर्मकांड नाहीत.
अवाजवी बंधने नाही.
पुस्तकी बडबड नाही.
भेदभाव अजिबात नाही.

सबळ व्यावहारिक अनुभव.
तुमचा देव निवडण्याचे स्वातंत्र्य.
तुमच्या गतीने कृती करण्याचे स्वातंत्र्य.
स्वतःला स्वीकारण्याचे स्वातंत्र्य.
कृती हा जादूई शब्द आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे

निनांवीपणा हा सेवांचा पाया आहे.

माझं नाव कुमार एक्स आणि मी एक कृतज्ञ मद्यमुक्त दारुडा आहे.

दारूपासून दूर राहण्याची इच्छा असणाऱ्या सर्व मद्यपीडितांनो या ... मी तुमच्यासाठी इथे आहे. मी तुम्हाला माझा अनुभव, आशा आणि धैर्य देतो.
दारूशिवाय जीवन...
सुंदर, अद्भुत आणि जिवंत असते.

कोणतीही अंधश्रद्धा नाही.
कोणतेही कर्मकांड नाही. कोणतीही फी नाही.

माझ्याबद्दल...

मी कुमार एक्स आहे आणि मी एक कृतज्ञ दारुडा आहे. माझी मद्यमुक्तीची तारीख 2 जुलै 2021 आहे. 
मी तुमचा प्रारंभिक मार्गदर्शक आहे (दारूपासून मुक्तीसाठी). माझ्याबद्दल येथे जाणून घ्या.

  • मी 27 वर्षांपासून मद्यपाश या आजाराने ग्रस्त होतो.
  • मी माझे कुटुंब, नातेवाईक, मित्र, बंधुभगिनी आणि सहकारी या सर्वांना गमावले होते.
  • माझा व्यवसाय बुडाला होता आणि माझ्यावर सुमारे ३० लाखांचे कर्ज होते.
  • मी एखाद्या चालणाऱ्या मृतदेहासारखा होतो. ज्यात जिवंतपणा नव्हता. आशा नव्हती. मार्ग नव्हता.
  • मी विनाशाच्या कोठडीत टाकला गेलो होतो. असहाय पणे श्वास घेणाऱ्या निष्प्राण शरीरासारखा मी झालो होतो.
    परंतु….

मला एक अद्भुत अल्को-स्पिरिच्युअल रिकव्हरी प्रोग्राम (एएसआरपी) मिळाला. साधा, सोपा आणि सहज. मी तो स्वीकारला.
या अद्भुत ए एस आर पी मुळे मी रोज चैतन्यमय जीवन जगत आहे. अल्कोहोलपासून मुक्ती मिळविण्यासाठी मी प्रत्येक मद्यपीला हा प्रोग्रॅम देऊ करण्यासाठी तत्पर आहे. लक्षात ठेवा… तुम्ही स्त्री, पुरुष किंवा इतर असे कुणीही असा…..
दारूपासून स्वातंत्र्य शक्य आहे..आणि मी तुमच्यासाठी इथे उपलब्ध आहे.
निनांवीपणा हे मूळ तत्व आहे. स्वतःची इच्छा ही गुरुकिल्ली आहे. कृती हा जादुई शब्द आहे.

मी कुमार एक्स आहे. मी भेदभाव न करता सेवेसाठी उपलब्ध आहे.

सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत माझ्याशी संपर्क साधा.

अल्कोट्राइब, इंदिरानगर, नाशिक 422009. महाराष्ट्र भारत.

मद्यपाश मुक्ती सेवा प्रकल्पाला तुम्ही स्वेच्छेने आर्थिक योगदान देऊ शकता.

Scroll to Top